ओबीसी समाजाने काल एल्गार मोर्चा काढला. यापार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र केले.
यावेळी ते म्हणाले की, "ओबीसी समाजाने फार मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे महायुती अतिशय दमणपुर्ण आहे. भाजपाने सांगितले पाहिजे की, त्यांचा डीएनए ओबीसी आहे. ज्या पद्धतीने हा जीआर काढला. आता आम्ही शांतपणे कोर्टात केस लढत आहोत. अशा विखे पाटलांनी पुन्हा पुन्हा जाऊन ओबीसींना नाराज करणं त्याला ओबीसी काय मनात म्हणतील. उद्या त्यांचा परिणाम या येणाऱ्या निवडणुकांमध्ये झाल्या तर काय होईल. देवेंद्र फडणवीस आपलं मतधिक्य राखण्यामध्ये कमी पडलात."