bhupendra patel  Team Lokshahi
ताज्या बातम्या

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, या मंत्र्यांनी घेतली शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित

Published by : Sagar Pradhan

नुकताच गुजरात निवडणुक पार पडली. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. भाजपला 156 जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. त्यानंतर आज गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.

या मंत्र्यांनी शपथ घेतली

कॅबिनेट मंत्री

1- कनुभाई देसाई

२- हृषीकेश पटेल

3- राघवजी पटेल

4- बलवंतसिंग राजपूत

5- कुंवरजी बावळ्या

6- मुलुभाई बेरा

7- भानुबेन बाबरियाथ

8- कुबेर डिडोर.

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

9- हर्ष संघवी

10- जगदीश विश्वकर्मा

राज्यमंत्री

11- मुकेश पटेल

12- पुरुषोत्तम सोळंकी

13- बच्चू भाई खबर

14- प्रफुल्ल पानसेरिया

15- भिखूसिंग परमार

16- कुंवरजी हलपती

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा