Admin
ताज्या बातम्या

रामनवमीला मोठी दुर्घटना, इंदूरमध्ये मंदिरातील विहिरीचे छत कोसळून 25 हून अधिक जण आत पडले

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी घटना घडली आहे. इंदूरमध्ये मंदिरातील विहिरीचे छत कोसळून 25 हून अधिक जण आत पडले. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. मात्र, विहिरीत पाणी असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. लोकांना मंदिराजवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

रामनवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक मंदिरात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. लोक पूजा आणि आरती करत होते. मंदिरात एक पायरी विहीर होती, त्यावर १० वर्षांपूर्वी छत टाकण्यात आले होते. पूजेच्या वेळी 20-25 लोक पायरीच्या छतावर उभे होते, त्यावेळी छत कोसळल्याने सुमारे 20-25 जण विहिरीत पडले. ही पायरी विहीर 50 फूट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे.

इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांनी सांगितले की, संख्या सांगणे कठीण आहे. ५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. विहिरीत पडलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याला आमचे प्राधान्य आहे. बचाव पथक, पोलीस आणि स्थानिक लोक लोकांना बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. ज्यांना बाहेर काढण्यात आले आहे त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!

Uddhav Thackeray On PM Modi : "मोदींच्या मनात पाप असलं तरी मी..." उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Nikhil Bane : "Finally माझ्या आयुष्यात ती आली..." म्हणत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेने केली पोस्ट शेअर