ताज्या बातम्या

मुंबई पोलिसांची याकूबच्या कबरीवर मोठी कारवाई; कबरीवरच्या एलईडी लाईट्स काढल्या

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची माहिती मिळत आहे. कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या होत्या. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर मार्बल आणि LED लाईट्स लावण्यात आल्या होत्या. कबरीच्या ओट्याला एकंदरीत संगमरवरी बसवले आहे. LED दिवे लावले आहेत जे रात्रीच्या मुख्यतः मेमनची कबर प्रकाश झोतात राहिल या अनुशंगाने लावलेले दिसतात.

मात्र आता मुंबई पोलिसांची याकूबच्या कबरीवर कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. याकूबच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्स पोलिसांनी काढून टाकल्या आहेत. मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी ही कारवाई केली आहे.

मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी दिल्यानंतर 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते.

"...तर कांद्याची माळ घालून मोदींचं स्वागत करा"; नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेपूर्वी आमदार रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

IPL 2024 : आता चेन्नई सुपर किंग्जसाठी खतरा! RCB ला 'प्ले ऑफ'मध्ये पोहचवणार '18'; जाणून घ्या या नंबरचं खास कनेक्शन

Kalyan Lok Sabha: मोदींच्या सभेत स्टेजवर स्थान नसल्याने मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरेंचा राजीनामा

Chicken Momos Recipe: घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीत बनवा चटपटीत चिकन मोमोज; जाणून घ्या रेसिपी...

T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्यासाठी मोठी घोषणा, भारताने टॉप-४ मध्ये प्रवेश केल्यास 'या' ठिकाणी रंगणार सामना