ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची प्रतिक्षा संपणार 'या' तारखेला मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता?

लाडकी बहिन योजना एप्रिल महिन्याचा हप्ता 'या' दिवशी मिळणार, लाडक्या बहिणींची प्रतिक्षा संपणार!

Published by : Prachi Nate

महाराष्ट्रात निवडणुकीआधी सुरु केलेली लाडकी बहिण ही योजना महायुतीसाठी विजयाचा तीर ठरली. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी हि योजना रक्षाबंधन पूर्वी प्राधान्याने राबविण्यात आली. सध्या संपुर्ण राज्यभर गाजलेली योजना म्हणून महायुती सरकारनं महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहिण योजनेकडे पाहिलं जात. लाडकी बहीण योजनेवरुन अनेक चर्चा सुरु आहेत. या योजनेअतंर्गत अनेक बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला मात्र काही असेही कुटुंब आहेत ज्यांना या योजनेमुळे एक आधार मिळाला. या योजनेअतंर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

मात्र, या अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वांत लोकप्रिय योजनेपैकी एक ठरली आहे. लाडकी बहिण योजनेचे आतापर्यंत 8 ते 9 हप्ते लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. त्यामुळे आता लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सुरुवातीला रामनवमीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे येतील अशी शक्यता लावण्यात आली होती. मात्र, ही शक्यता खोटी ठरली. त्यामुळे आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 30 एप्रिलला अक्षय तृतीयाच्या मूहूर्तावर लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट 1500रु. जमा होण्याची शक्यता आहे.

'या' दिवशी मिळणार लाडक्या बहि‍णींना 2100 मिळणार

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेच्या 2100 रुपयांवर निवेदन केलं होत. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते की, लाडकी बहिण योजनेचे पैसे आम्ही देणार आहोत. देणार नाही असे आम्ही बोललो नाही. तसेच याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये देणार आहोत. महाराष्ट्राचा जीडीपी अव्वल आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती. याचसोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, जाहिरनामा हा 5 वर्षांसाठी असल्यामुळे या 5 वर्षांच्या काळात आम्ही लाडक्या बहि‍णींना कधीही 2100 रुपये देऊ. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं

Ramdas Kadam On Thackeray Bandhu: राजकीय भूकंपाची शक्यता?; राज-उद्धव एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप

Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा विजय! ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर