Nationalist Sharad Pawar Group Nationalist Sharad Pawar Group
ताज्या बातम्या

Nationalist Sharad Pawar Group : राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का; महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर भाजपात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश

निवडणूक आयोगाने घोषणा करताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना मोठा फटका बसला असून, भाजपमध्ये महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

Published by : Riddhi Vanne

(Nationalist Sharad Pawar Group) राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला असून, त्यानंतर लगेचच राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने घोषणा करताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना मोठा फटका बसला असून, भाजपमध्ये महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पक्षप्रवेशामुळे अनेक पक्षांना धक्का बसला असला तरी, काही ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही नेतेसुद्धा भाजपकडे वळले आहेत.

आज झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

या घोषणेनंतर लगेचच धुळ्यात राजकीय घडामोडी घडल्या. धुळ्याच्या माजी महापौर कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या सोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक गुलाब माळी आणि कैलास मराठे यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह हा प्रवेश झाल्यामुळे धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा बदल झाल्याने शहरात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे.

दरम्यान, येणाऱ्या महापालिका निवडणुका बहुतेक ठिकाणी महायुतीतूनच लढवल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. तसेच एकमेकांचे कार्यकर्ते पक्षात घेणार नाहीत, असा निर्णय महायुतीत झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा