मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा निर्णय घेतला आहे. डिजिटल सेवा अधिक सुलभ आणि एकसंध करण्याच्या उद्देशाने रेल्वेने ‘Rail One’ हे नवीन अधिकृत मोबाईल अॅप सुरू केले असून, त्यामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर वापरात असलेले UTS (Unreserved Ticketing System) ॲप कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. विशेषतः मासिक पास काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या UTS ॲपवरील सुविधा आता उपलब्ध राहणार नाही.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई लोकलसह उपनगरीय रेल्वेसाठीचे मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पास आता केवळ Rail One या एकाच ॲपवरूनच काढता येणार आहेत. आतापर्यंत तिकीट बुकिंग, पास नूतनीकरण, ट्रेनची माहिती यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करावा लागत होता. ही गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि ‘One Nation, One App’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने Rail One हे सर्वसमावेशक ॲप विकसित केले आहे.
या नव्या ॲपमध्ये केवळ पास किंवा तिकीट काढण्याचीच सुविधा नाही, तर ट्रेनचे लाईव्ह स्टेटस, प्लॅटफॉर्म क्रमांक, प्रवासाशी संबंधित सूचना तसेच इतर अनेक डिजिटल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता वेगवेगळ्या ॲप्समध्ये स्विच करावे लागणार नाही.
UTS ॲप पूर्णपणे बंद
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आता नवीन पास काढणे किंवा जुन्या पासचे नूतनीकरण UTS ॲपवरून करता येणार नाही. मात्र, ज्या प्रवाशांनी आधीच UTS ॲपवरून पास काढले आहेत, त्यांचे पास वैधतेच्या कालावधीपर्यंत वापरता येणार आहेत. पास संपल्यानंतर नवीन पाससाठी Rail One ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक असेल. हे ॲप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हाय-स्पीड पेमेंट गेटवे आणि R-Wallet
डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी Rail One ॲपमध्ये UPI, नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड यांसारखे पेमेंट पर्याय देण्यात आले आहेत. तसेच, या ॲपमध्ये R-Walletची सुविधाही उपलब्ध असून, यामुळे तांत्रिक अडचणींमुळे पैसे अडकण्याचे प्रकार टाळता येणार आहेत. हाय-स्पीड पेमेंट गेटवेचा वापर केल्यामुळे गर्दीच्या वेळेतही तिकीट आणि पास बुकिंग अधिक जलद होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
या बदलामुळे रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांसमोरील लांबच लांब रांगा कमी होण्यास मदत होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांना जास्तीत जास्त Rail One ॲपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई लोकलसह उपनगरीय रेल्वेसाठीचे मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पास आता केवळ Rail One या एकाच ॲपवरूनच काढता येणार आहेत. आतापर्यंत तिकीट बुकिंग, पास नूतनीकरण, ट्रेनची माहिती यासाठी प्रवाशांना वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करावा लागत होता. ही गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि ‘One Nation, One App’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने Rail One हे सर्वसमावेशक ॲप विकसित केले आहे.
या नव्या ॲपमध्ये केवळ पास किंवा तिकीट काढण्याचीच सुविधा नाही, तर ट्रेनचे लाईव्ह स्टेटस, प्लॅटफॉर्म क्रमांक, प्रवासाशी संबंधित सूचना तसेच इतर अनेक डिजिटल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता वेगवेगळ्या ॲप्समध्ये स्विच करावे लागणार नाही.