ताज्या बातम्या

Nagar Parishad Election : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ‘या’ दोन ठिकाणी निवडणुका रद्द, 20 डिसेंबरला होणार मतदान

मोठी अपडेट सातारा (Satara) जिल्ह्यातील महत्वाच्या दोन नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात (nagarparishad elections) समोर आली आहे.

Published by : Varsha Bhasmare

मोठी अपडेट सातारा (Satara) जिल्ह्यातील महत्वाच्या दोन नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात (nagarparishad elections) समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. या दोन्ही नगर परिषदेच्या निवडणुका (Nagar Parishad Election) आता 20 आणि 21 डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया लांबीवर पडण्यामागचे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे.

नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिनांक 10 डिसेंबर दुपारी तीन पर्यंत असणार

दरम्यान, जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रिया बाबत याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळं जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी घेतला आहे. 4 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक जारी करण्याची तारीख देण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अंतिम दिनांक 10 डिसेंबर दुपारी तीन पर्यंत असणार आहे. चिन्ह नेमून देण्यासाठी आणि अंतिम रित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक 11 डिसेंबर 2025 असणार आहे. मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर 2025 सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत असणार आहे. मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.

अनिकेतराजे नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून मैदानात

फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेनेकडून लढवणार आहेत. त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दुसरीकडे ऐनवेळी त्यांच्या भावाला नगराध्यपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार

राजकीय घडामोडींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेग आला आहे. ऐकमेकांवर राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरु केला आहे. काही ठिकाणी महायुती झाली आहे तर काही ठिकाणी महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. दरम्यान, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा