थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Srinagar Blast) श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत 7 जणांचा मृत्यू, 27 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूल प्रकरणाच्या संदर्भात अलीकडेच जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून नमुने काढताना हा स्फोट झाला असल्याची माहिती मिळत आहे.
तपासात जप्त केलेले अमोनियम नायट्रेट नावाचे स्फोटक पदार्थ तपासताना हा अपघात घडला. या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. या स्फोटात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या. या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच आता ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
Summery
श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनजवळ स्फोट
स्फोटातील मृतांचा आकडा वाढला
स्फोटात 7 जणांचा मृत्यू, 27 जण जखमी