ताज्या बातम्या

मोठी बातमी! एकनाथ खडसे देखील गुवाहाटीला जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 50 बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी गाठणार असल्याची बातमी असताना एक मोठी बातमी समोर आली आहे.

Published by : shweta walge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 50 बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी गाठणार असल्याची बातमी असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे देखील गुवाहाटीला जाणार आहेत.एकनाथ खडसे यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाच्या पुन्हा गुवाहाटीला जाण्याच्या चर्चेवर टीका केली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, “मी दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो. आताही मी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे, आणि परत आमचं सरकार येऊ दे, असं साकडं घालणार”, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. 40 बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी आहे, असा टोला खडसेंनी लगावला आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेलच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात खडसे बोलत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का? महापालिका निवडणुकीपूर्वीच पडद्यामागील हालचालींना वेग

Nitesh Rane On Aaditya Tackeray : "आदित्य ठाकरे उद्या बुरख्यातून मॅच बघेल" वरळीत कोळीवाड्यात नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Sharadiya Navratri 2025 : नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ; कोणत्या दिवशी कोणता रंग? जाणून घ्या ...

Banjara Reservation : "ST आरक्षण द्या..." सुसाईड नोटमध्ये आरक्षणाची मागणी करत, बंजार समाजातील तरुणाचे टोकाचे पाऊल