ताज्या बातम्या

Mumbai Local Megablock : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पश्चिम रेल्वेवर 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान ब्लॉक, 250 लोकलही रद्द

Published by : Team Lokshahi

मुंबईकरांसाठी (Mumbai News) अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते बोरिवली (Borivali) ही सहावी मार्गिका जोडण्यासाठी पश्चिम रेल्वेवर (Western Railway) ब्लॉक घेण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत 250 लोकल आणि 61 मेल, एक्सप्रेसही रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे तब्बल 10 दिवस पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे.

तब्बल 15 वर्षे रखडलेल्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली या सहाव्या मार्गिकेच्या जोडणीचं काम पश्चिम रेल्वेने सुरू केलं आहे. सध्या प्राथमिक काम सुरू असून मुख्य काम दसऱ्यानंतर म्हणजेच, 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून यामध्ये रोज सरासरी 250 लोकल आणि 61 मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे दसऱ्यानंतर पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडी कळ सोसावी लागणार आहे.

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...