ताज्या बातम्या

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आरे ते बीकेसी दरम्यान मेट्रो धावणार

Published by : Dhanshree Shintre

मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होण्यासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रोच जाळे उभारण्यात येत आहेत. यापैकी केंद्र आणि राज्य सरकारचा बहुचर्चित महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रो 3 या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच पहिला टप्पा आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान मेट्रो धावणार आहे. याचपार्श्वभूमीवर तिकीट विक्री आणि ग्राहक सेवेसाठी एमएमआरसीएलने विशेष संस्थेची नियुक्ती केली आहे. याकरिता मेट्रो प्रशासनाने निविदा देखील मागवल्या आहेत.आरे ते बीकेसी मार्ग सुरु झाल्यानंतर मुंबईकरांना वाहतुक कोंडीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मार्च 2024 मध्ये आरे - बीकेसी हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार होता. मात्र हा मुहूर्त चुकला असून मे 2024 अखेरीस आरे - बीकेसी भुयारी मेट्रो धावणार आहे. बीकेसी वरळी दुसरा टप्पा सेवेत येईल आणि पुढे वरळी कुलाबा तिसरा टप्पा कार्यान्वित करण्याचे एमएमआरसींचे नियोजन आहे

पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी या मार्गात एकूण 10 स्थानके असून नऊ भुयारी, तर एक जमिनीवर आहे. तसेच हे अंतर 12.44 किमी आहे आणि दोन गाड्यांमधील कालावधी 6.5 मिनिटे आहे. या मार्गावर पहिल्या टप्प्यात 9 गाड्या धावतील. आणि दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते कफ परेड या मार्गावर 17 स्थानके असणार आहेत.

मेट्रो लाइन 3 स्थानकांची नावे

कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, विज्ञान संग्रहालय, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी, धारावी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, सांताक्रूझ, CSIA टर्मिनल 1 (देशांतर्गत विमानतळ), सहार रोड, CSIA टर्मिनल 2 (आंतरराष्ट्रीय विमानतळ), मरोळ नाका, MIDC, SEEPZ आणि आरे कॉलनी (ओन्ली – ग्रेड स्टेशनवर).

Chicken Momos Recipe: घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीत बनवा चटपटीत चिकन मोमोज; जाणून घ्या रेसिपी...

T20 World Cup 2024 : सेमीफायनल सामन्यासाठी मोठी घोषणा, भारताने टॉप-४ मध्ये प्रवेश केल्यास 'या' ठिकाणी रंगणार सामना

Sambhajinagar च्या पाणी प्रश्नावरून न्यायाधीश उतरले रस्त्यावर

Sanjay Raut: 'मोदींनी शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान केलाय' मोदींच्या जिरेटोपावरुन राऊतांचा हल्लाबोल

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...