ताज्या बातम्या

Konkan Railway Megablock: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; कोकण रेल्वेवर आज ‘ब्लॉक’

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेवरील वीर-अंजणी स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी मंगळवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेवरील वीर-अंजणी स्थानकांदरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी मंगळवारी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात आला आहे. दुपारी 1:10 ते 3:40 असा अडीज तासांचा ‘मेगा ब्लॉक’ असेल. या यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होणार आहे. दुपारी 1:10 ते 3:40 या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मंगळवारी गाडी क्रमांक 16345 एलटीटीवरून सुटणारी तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस कोलाड-वीर विभागादरम्यान 40 मिनिटे थांबवण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी रोडवरून सुटणारी दिवा एक्स्प्रेस रत्नागिरी-चिपळूण विभागादरम्यान एक तास थांबवण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. सोमवारी सुटणारी गाडी क्रमांक 02197 कोईम्बतूर जं. जबलपूर एक्सप्रेस मंगळवारी रत्नागिरी-चिपळूण विभागादरम्यान 45 मिनिटांसाठी थांबवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.

दरम्यान, कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल 3 गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर वेळापत्रक लागू झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा