ताज्या बातम्या

CNG Price : सीएनजीच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवे दर

सीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सीएनजीच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. महानगर गॅसने नवे दर जाहीर केले आहेत. सीएनजीच्या दरांमध्ये प्रति किलो 2.5 रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र पीएनजीच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आजपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये महानगर गॅसचे सीएनजीची किंमत प्रति किलोग्रॅम 73.50 रुपये इतकी असणार आहे. दर कपातीमुळे या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील असं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा