Gautam Adani : सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा Gautam Adani : सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा
ताज्या बातम्या

Gautam Adani : सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा; गौतम अदानी म्हणाले की,...

सेबीच्या क्लीन चिटनंतर अदानी समूहाला मोठा दिलासा गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • अदानी समूहावर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप अखेर खोटे ठरले.

  • सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुरुवारी जाहीर आदेश जाहीर केले.

  • स्टॉक मॅनिप्युलेशन किंवा गैरव्यवहाराचे कोणतेही पुरावे अदानी समूहाविरुद्ध आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले.

Gautam Adani : अदानी समूहावर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप अखेर खोटे ठरले आहेत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुरुवारी जाहीर केलेल्या आदेशात, स्टॉक मॅनिप्युलेशन किंवा गैरव्यवहाराचे कोणतेही पुरावे अदानी समूहाविरुद्ध आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे समूहाला मोठा दिलासा मिळाला असून, या प्रकरणाचा शेवट सेबीच्या क्लीन चिटने झाला आहे.

सेबीने आपल्या तपासणीत सांगितले की, अदानी समूहाने कोणत्याही नियमांचा भंग केलेला नाही. संबंधित नसलेल्या कंपन्यांसोबत केलेले व्यवहार त्या काळातील नियमांतर्गत चुकीचे मानले जाऊ शकत नाहीत, कारण ती व्याख्या 2021 पासूनच लागू झाली होती. तसेच समूहाने घेतलेली कर्जे परतफेड करण्यात आली असून, निधी वळवण्यात आल्याचा दावा खोटा ठरला. त्यामुळे फसवणूक किंवा अन्याय्य व्यवहार झालेले नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले.

सेबीच्या या निर्णयानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “सखोल चौकशीने हे सिद्ध केले की हिंडेनबर्गचे सर्व आरोप आधारहीन होते. अदानी समूह नेहमीच पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर उभा राहिला आहे. या खोट्या अहवालामुळे ज्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला, त्यांच्या वेदना आम्हाला समजतात. अशा अफवा पसरवणाऱ्यांनी देशाची माफी मागावी.” त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट “सत्यमेव जयते, जय हिंद” अशा शब्दांत केला.

याआधी हिंडेनबर्गने 106 पानी अहवाल प्रसिद्ध करून अदानी समूहावर समभागांचे भाव कृत्रिमरीत्या वाढवण्याचा, बोगस कंपन्यांच्या मदतीने गैरव्यवहार करण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर कर्ज फुगवण्याचा आरोप केला होता. या अहवालामुळे समूहाच्या कंपन्यांच्या समभागांत मोठी घसरण झाली होती आणि गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागला होता.

पण आता सेबीच्या तपासणीने परिस्थिती स्पष्ट केली आहे. सर्व आरोप फोल ठरल्याने अदानी समूहाने मोठा दिलासा मिळवला आहे आणि या घडामोडींनंतर कंपनीच्या भविष्यातील गुंतवणूक वातावरणालाही सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : महापालिका निवडणुकीसाठी मनसेची रणनिती निश्चित, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या थेट सूचना

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची 'दशावतार' चित्रपटाला प्रशंसा, कोकणाची व्यथा महाराष्ट्राच्या मनात

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन