Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट! ऑगस्ट, सप्टेंबरला हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता? Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट! ऑगस्ट, सप्टेंबरला हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता?
ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठी अपडेट! ऑगस्ट, सप्टेंबरला हप्ता एकत्र मिळण्याचा शक्यता?

लाडकी बहिण अपडेट: ऑगस्ट-सप्टेंबर हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता, महिलांना दिलासा!

Published by : Riddhi Vanne

Big update in Ladki Bahin Yojana! Possibility of getting installments together in August and September? : ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने महिलांमध्ये नाराजी वाढली आहे. गणेशोत्सवातही अपेक्षित रक्कम न मिळाल्याने महिलांचा सण गोडाऐवजी कडू झाला. बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली तरीही ऑगस्ट महिन्याचे पैसे खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये मोठा असंतोष आहे.

या पार्श्वभूमीवर आता नवी अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते याच महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच, महिलांच्या खात्यात एकाच वेळी ३,००० रुपये जमा होऊ शकतात. मात्र हे पैसे एकत्रित मिळतील की वेगवेगळ्या तारखांना जमा होतील, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. तरीही हा निर्णय महिलांसाठी दिलासादायक ठरणार यात शंका नाही.

दरम्यान, योजनेतील पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत. काहींची नावे वगळली गेली, तर काहींना तांत्रिक कारणांमुळे पैसे मिळालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला या योजनेसाठी तब्बल २ कोटी ६३ लाखांहून अधिक नोंदणी झाल्या होत्या. विभागीय स्तरावर पडताळणी करून तो आकडा आता २ कोटी ४८ लाखांवर आणण्यात आला. "स्क्रूटिनी केली नसती तर गैरफायदा घेणाऱ्यांची संख्या अधिकच राहिली असती," असे त्या म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेत गैरप्रकारही उघड झाले आहेत. सरकारी सेवेत असलेल्या महिलांनी लाभ घेतल्याचे, तसेच हजारो पुरुषांनी बोगस नोंदणी करून पैसे लाटल्याचे प्रकार समोर आले आहेत. दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी असणाऱ्या या योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशाराही सरकारने दिला आहे.

एकूणच, लाडकी बहीण योजनेतून महिलांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत असला तरी विलंब, पडताळणी आणि गैरप्रकार यामुळे नाराजी निर्माण झाली आहे. आता सरकारने महिलांच्या खात्यात थकलेले हप्ते तत्काळ जमा करून विश्वासार्हतेचा प्रश्न मिटवणे आवश्यक आहे. कारण, सणासुदीच्या काळात महिलांसाठी प्रत्येक रुपया महत्त्वाचा असतो आणि सरकारच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे डोळे खिळलेले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन

Gujarat Pavagadh Ropeway Accident : गुजरातमध्ये भीषण दुर्घटना; रोपवे कोसळून सहा जणांचा मृत्यू

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचला; गणेशभक्तांची मोठी गर्दी

Rain Alert : आज देशभरात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी