Ajit Pawar 
ताज्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघात तपासाबाबत मोठी अपडेट

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ajit Pawar) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

यातच आता अजित पवारांच्या विमान अपघात तपासाबाबत मोठी अपडेट समोर आल्याची माहिती मिळत असून लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नाबाबत आता जास्त तपास केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विमान अपघाताच्या तीन ते चार प्रमुख गोष्टींबाबत तपास करण्यात येणार असून विमानतळावरील दृश्यमानता, कमांड सिस्टिममध्ये त्रुटी, अप्रोच आणि लँडिंगदरम्यान विमानाच्या प्रणालीत बिघाड यावर सखोल पद्धतीने तपास करण्यात येणार आहे.

लँडिंगसाठी क्लिअर कमांड दिली होती का? तसेच दृश्यमानता कमी असतानाही लँडिंगचा प्रयत्न केला गेला? या प्रश्नांवर आता अधिक तपास करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. अशी परिस्थिती असताना देखील लँडिंगचा निर्णय का घेण्यात आला? असा सवाल आता उपस्थित केला जात असून याबद्दल तपास करण्यात येत असल्याची देखील माहिती मिळत आहे.

Summary

  • अजित पवारांच्या विमान अपघात तपासाबाबत मोठी अपडेट

  • लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नाबाबत दिला जाणार तपासावर भर दिला जाणार?

  • विमान अपघाताच्या तीन ते चार प्रमुख गोष्टींबाबत तपास करण्यात येणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा