ताज्या बातम्या

Salman Khan Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्ररणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 5 जणांना अटक केली आहे.

Published by : Dhanshree Shintre

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्ररणामध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 5 जणांना अटक केली आहे. आता या गोळीबार प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. हरियाणाच्या फतेहाबादवरून गुन्हे शाखेने ही अटक केली आहे. या आरोपीला मोक्का कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी एकूण अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा वर गेली आहे.

विकी चौधरी, सागर पाल, मोहम्मद चौधरी, सोनू चंदर आणि अनुज थापन अशी याआधी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आज सकाळी सहाव्या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव हरपाल सिंग असे आहे. तो 37 वर्षांचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

14 एप्रिल 2024 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा