Whatapp मध्ये मोठा अपडेट! ; स्टेट्समध्ये दिसणार जाहिराती  Whatapp मध्ये मोठा अपडेट! ; स्टेट्समध्ये दिसणार जाहिराती
ताज्या बातम्या

Whatapp मध्ये मोठी अपडेट! ; स्टेट्समध्ये दिसणार जाहिराती

व्हॉट्सॲप स्टेट्समध्ये जाहिरातींचा समावेश; युजर्समध्ये नाराजीची शक्यता.

Published by : Team Lokshahi

मेटा कंपनीने व्हॉट्सॲप एक महत्त्वाचा बदल केलेला आहे. व्हॉट्सॲप मध्ये आता जाहिराती पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रमाणे व्हॉट्सॲप वर ही जाहिरातींचा मारा होणार आहे. मेटाने २००४ मध्ये व्हॉट्सॲप खरेदी केल्यानंतर बऱ्याच काळानंतर एक मोठा बदल केला आहे. जाहिरातींचा भडीमार आतापर्यंत व्हॉट्सॲप वर कधीच झाला नव्हता यापुढे या जाहिराती आपल्याला व्हॉट्सॲप वर सुद्धा दिसणार आहे व्हॉट्सॲप मध्ये झालेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल आहे. मात्र यामुळे काही प्रमाणात व्हॉट्सॲप युजरमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होणार आहे.

कंपनीला महसूल निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे असे मेटाने यावेळी सांगितले . ही सुविधा लवकरच व्हॉट्सॲप मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन बदल फक्त स्टेटस टॅबमध्ये दिसेल मात्र युजरच्या पर्सनल चॅट, व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉलवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे व्हॉट्सॲप ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप वरती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी बोलत असताना कोणताही व्यत्यय येणार नाही. मात्र तुम्ही जर चॅनल किंवा स्टेटस वापरत असाल त्यात जाहिरातींचा अंतर्भाव झालेला पाहायला मिळेल. अलेक्स न्यूटन रेक्स यांच्या नेतृत्वाखाली व्हाट्सअप ने भारतातील व्हॉट्सॲप युजर साठी हे विशिष्ट फीचर्स समाविष्ट केले आहे. व्हॉट्सॲप ने हे सुद्धा स्पष्ट केले की जाहिराती संदर्भामध्ये जे बदल आहेत ते फक्त अपडेट टॅब वर असेल वैयक्तिकच्या कॉलिंग यामध्ये जाहिरातींचा अंतर्भाव राहणार नाही. तसेच यामध्ये वापरकर्त्यांचे फोन नंबर कोणत्याही परिस्थितीमध्ये जाहिरातदारांपर्यंत पोहोचवले जाणार नाहीत किंवा शेअर केले जाणार नाही.

आज भारतामध्ये कोट्यावधी लोकं व्हॉट्सॲप स्टेटस चा वापर करतात. त्यामुळे मेटा कंपनी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढवण्यासाठी अश्या वेगवेगळ्या प्रयोगाचा वापर करताना दिसत आहे. जाहिरातीच्या नव्या फिचर मुळे मोठे आणि लहान दोन्ही व्यवसायिकांना व्हॉट्सॲप वर आपल्या जाहिराती दाखवता येणार आहेत. आणि त्याद्वारे आपले उत्पन्न वाढवण्यात त्यांना मदत होणार आहे. व्हॉट्सॲपने जरी जाहिराती सुरू केल्या असल्या तरीही व्हॉट्सॲप युजर्स चे मेसेज त्या दोन व्यक्तिंव्यतिरिक्त कोणीही वाचू शकणार नाही . कंपनीचे लोक सुद्धा वाचू शकत नाही असे आश्वासन कंपनीने दिलेले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope |'या' राशीच्या व्यक्तींना अचानक होऊ शकतो धनलाभ, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Shrimant Yuvraj Sambhajiraje Bhosale : 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या प्रदेशाध्यक्षपदी श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची निवड

Chhatrapati Sambhajinagar : 35 वर्षांनंतर धक्का! PSI गफ्फार खान यांचे जात प्रमाणपत्र रद्द; पुढील वर्षी निवृत्तीपूर्वीच मोठा निर्णय