अभिजीत बिचुकले हे नेहमी चर्चेत असतात. मात्र आता ते वाहतुकीचा नियम मोडल्यामुळे चर्चेत आले आहेत. पुण्यामध्ये त्यांनी चुकच्या पद्धतीने गाडी चालवताना दिसत आहेत. त्यांना आता दंडदेखील ठोठावला. यावरून बीचुकले यांनी लोकशाही मराठीशी संपर्क साधला आहे. ते म्हणाले की, "हा कुणीतरी खोडसळपणा केला आहे. कोणीतरी मुद्दाम चित्रीकरण केले आहे. मी मान्य करतो की चुकीच्या मार्गाने गाडी चालवत होतो. माझे काही चाहते त्या ठिकाणी उभे होते त्यांना भेटण्यासाठी मी तिथे गेलो होतो. पण गाडी बाहेर काढण्यासाठी मी चुकीच्या मार्गाने गेलो. मात्र नंतर मी पोलिसांना सहकार्य केले आणि चलनदेखील भरले. पण हे मुद्दाम कणीतरी केले आहे".