ताज्या बातम्या

Jay Dudhane : लग्नानंतर 11 व्या दिवशी मोठा धक्का! जय दुधाणेला अटक, प्रकरण काय?

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील उपविजेता जय दुधाणे सध्या अडचणीत सापडला आहे. ठाणे पोलिसांनी त्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Riddhi Vanne

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील उपविजेता जय दुधाणे सध्या अडचणीत सापडला आहे. ठाणे पोलिसांनी त्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे त्याचा विवाह काही दिवसांपूर्वीच झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे पाच कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात जय दुधाणेवर कारवाई करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे काही दुकाने इतरांना विकल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या व्यवहारांमुळे अनेक लोकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात जयसोबतच त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांचीही चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

जय दुधाणे हा फिटनेस क्षेत्रात ओळखला जाणारा चेहरा असून तो प्रशिक्षक, मॉडेल आणि अभिनेता म्हणूनही काम करत होता. तो ठाण्यातील रहिवासी असून जिम व्यवसायाशी संबंधित आहे. तपासादरम्यान आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी जयने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलसोबत विवाह केला होता. ठाण्यातच हा सोहळा पार पडला होता. लग्नानंतर अवघ्या ११ दिवसांतच त्याला अटक झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

जय दुधाणे प्रथम ‘स्प्लिट्सव्हिला १३’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आला होता, ज्यात त्याने विजेतेपद मिळवलं. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सहभाग घेत त्याने उपविजेतेपद पटकावलं. काही मराठी चित्रपटांमध्येही तो झळकला आहे. या प्रकरणातील नेमके आरोप आणि तपशील अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे. जयची पत्नी हर्षला पाटील सोशल मीडियावर सक्रिय असून फॅशन आणि प्रवासाशी संबंधित व्हिडीओ शेअर करते. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा