थोडक्यात
गौतमी पाटीलच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट ?
अभिनेत्री थेट ‘इंडियन आयडॉल’ झळकणार
गौतमी पाटील आणि अभिजीत सावंतचे येणार नवीन गाणे?
Bigg Boss Marathi 5 Fame Abhijeet Sawant And Gautami Patil Selfie Viral Buzz About New Project : ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि लोकप्रिय गायक अभिजीत सावंत याने अलीकडेच संगीत क्षेत्रातील आपला 20 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये झळकल्यानंतर त्याच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली. तो सातत्याने नवे म्युझिक अल्बम आणि प्रोजेक्ट्स करत असून अलीकडेच त्याने काही अल्बम्स प्रदर्शित केले, ज्यांना प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.
दरम्यान, अभिजीत सावंत आणि महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याचे कारण म्हणजे गौतमीने आपल्या इन्स्टाग्रामवर अभिजीतसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला “NEW” असे कॅप्शन दिल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दोघेही हसताना दिसणाऱ्या या छायाचित्राने नव्या गाण्याच्या किंवा अल्बमच्या चर्चेला जोर चढला आहे.
गौतमी पाटीलने अलीकडेच ‘प्रेमाची गोष्ट 2’ या चित्रपटातील आयटम सॉंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली होती. यापूर्वी ती ‘सोनचाफा’, ‘आई गोंधळाला ये’ अशा लोकप्रिय म्युझिक व्हिडिओंमध्ये झळकलेली आहे. दुसरीकडे, अभिजीत सावंतच्या ‘प्रेमरंग सनेडो’ आणि ‘चाल तुरू तुरू’ या गाण्यांना कोट्यवधींच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत. दोघांनी एकत्र काम केल्यास हा प्रोजेक्ट संगीतप्रेमींसाठी खास ठरणार, अशी चर्चा सध्या मनोरंजन विश्वात रंगली आहे. मात्र, दोघांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.