बिग बॉस मराठी सीजन 6 सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले असून घरातील वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. सध्या दुसऱ्या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ रंगात आला आहे. नुकत्याच झालेल्या भागात होस्ट रितेश देशमुख यांनी अनुश्री माने आणि रुचिता जामदार यांना त्यांच्या वागणुकीवरून चांगलेच सुनावले. मागील आठवड्यातील गोंधळावर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केले, तर मेहनत करणाऱ्या स्पर्धकांचे कौतुकही केले.
आता शोचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यात घरातील खेळ अधिकच रंगताना दिसतो आहे. एका टास्कमध्ये स्पर्धकांना कोणता सदस्य घरात नको आहे हे सांगायचे असते. यावेळी शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा रोशन दादा अचानक आक्रमक झाल्याचे दिसले. त्याने तन्वी कोलतेविरोधात भूमिका घेतल्याने घरात वाद पेटला.
रोशनच्या मते, तन्वीने गरजेच्या वेळी साथ दिली नाही, तर तन्वीने आपली बाजू मांडत कॅप्टनसीचा मुद्दा पुढे केला. यामुळे दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद पुढे काय वळण घेणार, दोघे पुन्हा एकत्र येणार की मतभेद वाढणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पहिल्या एलिमिनेशनबाबत चर्चा सुरू असून राधा पाटील घराबाहेर पडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसून आजच्या ‘भाऊच्या धक्क्या’त सत्य समोर येणार आहे.
थोडक्यात
बिग बॉस मराठी सीजन ६ सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत.
घरातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे.
सध्या दुसऱ्या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
नुकत्याच झालेल्या भागात होस्ट रितेश देशमुख अॅक्शन मोडमध्ये दिसले.