‘बिग बॉस मराठी 6’ मध्ये प्रत्येक दिवसासोबत घरातील तापमान वाढत चालले आहे. नवीन कॅप्टन निवडण्यासाठी सुरू झालेल्या खास टास्कने घरात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना एकमेकांचे ‘ग्रह’ हटवावे लागत असून, याच कारणावरून तन्वी आणि विशाल आमनेसामने आले.
तन्वीने विशालला टास्कमधून बाहेर करण्याचा निर्णय घेताच दोघांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले. आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच रुचितानेही मध्ये उडी घेतली आणि वातावरण आणखी चिघळले. या टास्कमुळे मैत्री, गटबाजी आणि डावपेच स्पष्टपणे समोर येत आहेत.
कॅप्टन होण्याच्या स्पर्धेत घर जणू रणांगण बनले आहे. या भांडणांचा खेळ पुढे कोणते नवे वळण घेणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ सध्या पूर्ण मनोरंजनाचा डोस देत आहे.