bigg boss marathi 6 first wildcard promo out who is new contestant  
ताज्या बातम्या

Bigg Boss Marathi 6: तिसऱ्या आठवड्यातच मोठा ट्विस्ट? वाइल्ड कार्डची चाहूल

बिग बॉस मराठी 6 आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असून घरातील वातावरण आणखी रंगतदार होत आहे. दुसऱ्या आठवड्यात राधा पाटीलचा अचानक निरोप लागल्यानंतर स्पर्धक अजूनही धक्क्यात आहेत.

Published by : Riddhi Vanne

Bigg Boss Marathi 6 1st Wild Card Entry: बिग बॉस मराठी 6 आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असून घरातील वातावरण आणखी रंगतदार होत आहे. दुसऱ्या आठवड्यात राधा पाटीलचा अचानक निरोप लागल्यानंतर स्पर्धक अजूनही धक्क्यात आहेत. राधा ही या पर्वातून बाहेर पडलेली पहिली सदस्य ठरली. आता उरलेल्या 16 स्पर्धकांसाठी आणखी एक अनपेक्षित वळण येण्याची शक्यता आहे. कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमुळे वाइल्ड कार्ड एन्ट्रीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रोमोमध्ये सर्व सदस्य लिव्हिंग रूममध्ये स्क्रीनकडे पाहताना दिसतात. तेवढ्यात बिग बॉस घोषणा करतो की, “बिग बॉस मराठी 6 चे पहिले वाइल्ड कार्ड सदस्य येत आहेत.” फिरतं दार उघडताच काहीजण खुशीत टाळ्या वाजवतात, तर काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि तणाव दिसतो. मात्र, नेमका कोण येणार हे अजून गुपितच आहे.

प्रोमो व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आपापल्या आवडत्या नावांचा पाऊस पाडला आहे. खरंच नवा स्पर्धक घरात येणार की हा फक्त खेळाचा भाग आहे, याचं उत्तर लवकरच मिळणार आहे. आधीच्या पर्वांमध्ये वाइल्ड कार्ड उशिरा आले होते, पण यावेळी सुरुवातीलाच असा धक्का मिळणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

थोडक्यात

• बिग बॉस मराठी 6 आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असून घरातील वातावरण अधिक रंगतदार होत चालले आहे.
• दुसऱ्या आठवड्यात राधा पाटीलचा अचानक निरोप लागल्याने घरातील स्पर्धक अजूनही धक्क्यात आहेत.
• राधा पाटील ही या पर्वातून बाहेर पडलेली पहिली स्पर्धक ठरली.
• सध्या घरात एकूण 16 स्पर्धक उरले आहेत.
• उरलेल्या स्पर्धकांसाठी आणखी एक अनपेक्षित वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा