कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात प्रचंड घडामोडी पाहायला मिळाल्या. वाद, नियमभंग, बदलती मैत्री आणि तुटती नाती यामुळे घरातील वातावरण चांगलेच तापले होते. मात्र राकेश बापटने साकारलेली बाप्पाची मूर्ती आणि प्राजक्ताने सादर केलेलं भक्तिगीत यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली गेली.
आता वीकेंडच्या भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुख घरातील सदस्यांना आरसा दाखवताना दिसणार आहेत. चुकीचं वागणाऱ्यांची कानउघडणी होणार असून, चांगली कामगिरी करणाऱ्यांचं कौतुकही केलं जाणार आहे. विशेषतः प्राजक्ताशी वाद घालणाऱ्या अनुश्रीवर रितेश भाऊ चांगलेच संतापलेले दिसणार आहेत.
अनुश्रीची बोलण्याची पद्धत आणि आक्रमक वागणूक यामुळे घरातील तणाव वाढला होता. याच मुद्द्यावर रितेश भाऊ थेट सवाल करत शिस्तीची आठवण करून देताना दिसतील. “हे मजा करण्याचं ठिकाण नाही, नियम पाळावेच लागतील,” असा स्पष्ट संदेश ते देणार आहेत.
या धक्क्यानंतर घरातील समीकरणं बदलणार का, अनुश्रीची प्रतिक्रिया काय असणार आणि कोणाचं कौतुक होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. *बिग बॉस मराठी – भाऊचा धक्का* पाहायला विसरू नका, शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता, फक्त कलर्स मराठी आणि जिओहॉटस्टारवर.
थोडक्यात
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात मोठ्या घडामोडी
वाद, नियमभंग, बदलती मैत्री आणि तुटती नाती यामुळे घरातील वातावरण तापले
राकेश बापटने साकारलेली बाप्पाची मूर्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली
प्राजक्ताने सादर केलेल्या भक्तिगीताने प्रेक्षकांची मनं जिंकली
आता वीकेंडचा भाऊचा धक्का हा भाग प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा
रितेश देशमुख घरातील सदस्यांना आरसा दाखवताना दिसणार