Bigg Boss Marathi Season 6 Aayush-Tanvi's fun chemistry and the tension at home meet 
ताज्या बातम्या

Bigg Boss Marathi Season 6 : आयुष-तन्वीची मजेशीर केमिस्ट्री आणि घरातील तणावाचा संगम

बिग बॉस मराठीच्या घरात आजचा दिवस वेगळ्याच रंगात रंगणार आहे. नेहमीच्या वादांऐवजी यावेळी आयुष आणि तन्वी यांच्यात मोकळा संवाद पाहायला मिळणार आहे.

Published by : Riddhi Vanne

बिग बॉस मराठीच्या घरात आजचा दिवस वेगळ्याच रंगात रंगणार आहे. नेहमीच्या वादांऐवजी यावेळी आयुष आणि तन्वी यांच्यात मोकळा संवाद पाहायला मिळणार आहे. दोघेही आपल्या स्वभावाबद्दल बोलताना मजेशीर तुलना करताना दिसतील.

आयुष स्वतःला शांत आणि साधा स्वभावाचा म्हणतो, तर तन्वीला तो तिखट आणि ऊर्जावान व्यक्तिमत्त्वाची उपमा देतो. स्वभावातील फरक समजावण्यासाठी आयुष जेवणाच्या पदार्थांचं उदाहरण देतो, ज्यामुळे वातावरण हलकं-फुलकं होतं आणि तन्वीही हसताना दिसते.

मात्र दुसऱ्या बाजूला घरात तणाव वाढताना दिसणार आहे. नव्या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार वाद पेटलेला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दोघींचा संयम सुटतो आणि वातावरण तापतं.

आजच्या भागात हसवणाऱ्या गप्पा आणि तिखट भांडण यांचा भन्नाट संगम पाहायला मिळणार आहे. घरातली समीकरणं बदलणार की वाद आणखी भडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

थोडक्यात

  • बिग बॉस मराठीच्या घरात आजचा दिवस वेगळ्याच रंगात रंगणार आहे.

  • नेहमीच्या वादांऐवजी यावेळी आयुष आणि तन्वी यांच्यात मोकळा संवाद पाहायला मिळणार आहे.

  • दोघेही आपल्या स्वभावाबद्दल बोलताना मजेशीर तुलना करताना दिसतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा