bigg boss marathi season 6 contestant radha patil eviction many audience blame anushree for this  
ताज्या बातम्या

Bigg Boss Marathi 6 : राधाचं घरातून जाणं – प्रेक्षक म्हणतात, ‘हे न्याय होतं का?

बिग बॉस मराठी सिझन 6 च्या दुसऱ्या आठवड्यात घरातून राधा पाटीलची एक्झिट झाली आणि सगळ्यांनाच धक्का बसला.

Published by : Riddhi Vanne

बिग बॉस मराठी सिझन 6 च्या दुसऱ्या आठवड्यात घरातून राधा पाटीलची एक्झिट झाली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. तिच्या जाण्याने घरात भावनिक वातावरण निर्माण झालं, अनेक स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी होतं.

राधा बाहेर पडताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. काहींना हा निर्णय अनपेक्षित वाटला, तर काहींनी चुकीच्या गेमप्लॅनमुळे हे घडलं असं मत मांडलं. अनेक प्रेक्षकांनी “राधा जायला नको होती” असं स्पष्टपणे म्हटलं, तर काहींनी इतर स्पर्धकांवर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आता वाईल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा रंगू लागली आहे. घरात नवा चेहरा कोण असणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठी सिझन 6 दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळतो.

थोडक्यात

• बिग बॉस मराठी सिझन 6 च्या दुसऱ्या आठवड्यात घरातून राधा पाटीलची एक्झिट झाली.
• तिच्या अचानक जाण्याने घरातील सर्व स्पर्धकांनाच धक्का बसला.
• राधा पाटीलच्या जाण्यामुळे घरात भावनिक वातावरण निर्माण झाले.
• अनेक स्पर्धकांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांच्या भावनांचा पर्दाफाश झाला.
• या घटनेने प्रेक्षकांनाही भावनिक दृष्ट्या प्रभावित केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा