थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये भाजप विजयी झाला. यानंतर राष्ट्रावादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, 'सरकारच्या 10 हजारच्या योजनेचा परिणाम झाला असावा. बिहारमध्ये 50 टक्के मतदान महिलांचं, प्रत्येक महिलेला 10 हजार देणं ही लहान गोष्ट नाही. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं धक्कादायक पैसे वाटून निवडणुका होत असतील तर आयोगाने विचार करावा' यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, "जो पर्यंत कोणताही नेता आत्मपरीक्षण करणार नाही, तोपर्यंत त्याला अपयशाचे सामोरे जावे लागेल." याचसोबत, अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीच्या कारणावर फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चेची आवश्यकता होती.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बिबट्यांनी दहशत निर्माण केली आहे. या संदर्भात फडणवीस यांनी लवकरच एक बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर दिले की, "विरोधी पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र? परंतु, मुंबईच्या नागरिकांचा महायुतीवर विश्वास आहे. महायुतीचाच महापौर निवडून येईल." फडणवीस यांचा विश्वास आहे की महायुतीच्या विजयाची वाटचाल सुरु आहे आणि मुंबईतील जनतेने महायुतीला पसंती दिली आहे.
थोडक्यात
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला.
राष्ट्रावादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.