मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट बँकांमध्ये धडक देऊन मराठीचा वापर होतोय का? याची झाडाझडती घेतली. आता हाच मुद्दा पकडून उत्तर भारतीय विकास सेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावरुन आता मोठ्या प्रमाणात वाददेखील निर्माण झाले आहेत.
एकीकडे महाराष्टात हा वाद सुरू असताना, तिकडे दिल्लीतही मनसेच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. बिहारचे खासदार राजेश वर्मांनी हा मुद्दा थेट संसदेत उपस्थित करत महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर गुंडागिरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या मुद्द्यावरून पुढचे काही दिवस वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.
काय म्हणाले राजेश वर्मा ?
हिंदी भाषिकांवर महाराष्ट्रात गुंडगिरी होत आहे. पात्रतेच्या आधारावर नोकऱ्या मिळतात. उपकार करुन नोकऱ्या मिळत नाहीत.