Bill Gates 
ताज्या बातम्या

बिल गेट्स यांनी भारताबाबत केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर घमासान!

लिंक्डइनचे सहसंस्थापक रीड हॉफमनसोबतच्या पॉडकास्ट दरम्यान बिल गेट्सने भारताला "गोष्टी वापरण्यासाठी प्रयोगशाळा" असे संबोधल्यानंतर सोशल मीडिया माध्यम एक्सवर संताप व्यक्त केला जात आहे.

Published by : Team Lokshahi

जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये असणारे बिल गेट्स यांच्या एका वक्तव्यावरून समाज माध्यमांवर त्यांच्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. लिंक्डइनचे सहसंस्थापक रीड हॉफमनसोबतच्या पॉडकास्ट दरम्यान बिल गेट्सने भारताला "गोष्टी वापरण्यासाठी प्रयोगशाळा" असे संबोधल्यानंतर सोशल मीडिया माध्यम एक्सवर संताप व्यक्त केला जात आहे.

बिल गेट्स यांची व्हायरल झालेल्या या क्लिपवर भारतीय समालोचकांकडून टीका करण्यात आली. देशाबद्दल केलेल्या अब्जाधीश बिल गेट्स यांच्या वक्तव्यावर त्यांच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप करण्यात आला.

काय म्हणाले बिल गेट्स?

भारत असा देश आहे की ज्यामध्ये आरोग्य, न्यूट्रीशन, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सुधारण्यास पुरेसा वाव आहे. भारत सरकारकडे इतका रेवेन्यू आहे की येत्या २० वर्षात भारत झपाट्याने प्रगती करेल. भारत जणू ही एक प्रकारची प्रयोगशाळा आहे. भारतामध्ये एखाद्या गोष्टीस मान्यता मिळाली. तर ती गोष्ट जगात इतरत्र कुठेही चालू शकते. अनेक प्रकारचे महत्त्वाचे प्रकल्पामध्ये भारतासोबत भागिदारी आहे.

पाहा बिल गेट्स यांनी केलेलं वक्तव्य-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा