Lok Sabha|Uttar Pradesh Team Lokshahi
ताज्या बातम्या

भाजपने उत्तर प्रदेशात लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उमेदवार केले जाहीर, पण...

भाजपने अटकळांना दिला पूर्णविराम

Published by : Shubham Tate

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्याने पक्षाने मुस्लीम चेहरा मुख्तार अब्बास यांना लोकसभेवर (Lok Sabha) पाठवण्याची योजना आखल्याच्या अटकळांना पूर्णविराम दिला आहे. नक्वी यांना रामपूर किंवा आझमगडमधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती पण भाजपने आझमगडमधून दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांना उमेदवारी दिली आहे. (BJP announces candidates for both Lok Sabha seats in Uttar Pradesh)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार दिनेश लाल यादव यांना आझमगडमधून उमेदवारी दिली होती, परंतु अखिलेश यादव यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. आता भाजपने पुन्हा एकदा 'निरहुआ'ला लोकसभेत जाण्याची संधी दिली आहे. रामपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने धनश्याम लोधी यांना तिकीट दिले आहे.

रामपूर आणि आझमगडचे उमेदवार जाहीर झाल्याने नक्वी यांच्या उमेदवारीचा मार्ग बंद झाला आहे, मात्र मोदी नक्वी यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवतील, असा दावा भाजपच्या सूत्रांनी केला आहे. राज्यसभेच्या सात नामनिर्देशित सदस्यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे. नक्वी यांच्यासाठी एक जागा राखीव असल्याने नक्वी यांना राजीनामा द्यावा लागणार नाही.

हैदराबाद सामूहिक बलात्कार अन् भाजपला संधी मिळाली

हैद्राबादमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुलीवर बलात्कार करणारे पाचही आरोपी टीआरएस आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाशी संबंधित आघाडीच्या राजकारण्यांची मुले असल्याने भाजपला संधी मिळणार आहे. या घटनेमुळे तेलंगणात हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करण्याची भाजपला संधी मिळाली असताना मुख्यमंत्री चंद्रशेख राव बचावात्मक भूमिका घेत आहेत. हिंदुत्व प्रखर करण्यासाठी भाजपने हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सौदीन मलिक आणि उमर खान आरोपींना अटक केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर