ताज्या बातम्या

Maharashtra Election : विधान परिषदेसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नावं जाहीर

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. जाणून घ्या अधिक माहिती.

Published by : Prachi Nate

10 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये वेग पाहायला मिळत आहे. तसेच 17 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 मार्च आहे. त्याचसोबत उमेदवारी अर्जाचे परीक्षण 18 मार्चला होणार आहे. 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आज दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होणार आहे. या बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. तसेच भाजपकडून विधानपरिषदेवर तीन उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपकडून तीन उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार आहेत.

त्यामुळे भाजपकडून संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशींचं नाव जाहीर या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. दादाराव केचे यांचं नाव जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. तसेच विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजपसाठी आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाची एक जागा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा