kangana Ranaut
kangana Ranaut 
ताज्या बातम्या

भाजपची दुसरी यादी जाहीर, राज्यात दोन खासदारांना पुन्हा संधी, कंगना रनौतही लढणार लोकसभा निवडणूक

Published by : Naresh Shende

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा सुरु केलीय. भाजपने २० उमेदवारांची पहिली यादी १३ मार्चला जाहीर केली होती. दरम्यान, भाजपने आता राज्यातील तीन उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. सोलापूर लोकसभा मतदार संघातून राम सातपुते, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून खासदार अशोक नेते यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. तसंच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी खासदार सुनील मेंढे यांनाही पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तसंच हिमाचलच्या मंडी मतदारसंघात अभिनेत्री कंगना रनौत भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर मेरठमधून अरुण गोवील आणि सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगना रनौतने ट्वीट करत म्हटलंय, भारतीय जनता पक्षाने मला नेहमीच सहकार्य केलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय समितीकडून मला लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. माझे जन्मस्थान हिमचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश झाल्यामुळं मला आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जनतेच्या सेवेसाठी आणि एक उत्तम कार्यकर्ता बनवण्यासाठी मी प्रयत्न करेन. धन्यवाद.

इथे पाहा भाजपच्या उमेदवारांची सविस्तर यादी

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार