Arvind Kejriwal - Bhagwant Mann
Arvind Kejriwal - Bhagwant Mann Team Lokshahi
ताज्या बातम्या

भगवंत मान, केजरीवालांवर हत्येचा गुन्हा दाखल करा; गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर BJP ची मागणी

Published by : Sudhir Kakde

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाबचं भगवंत मान (Bhagwant Mann) सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे. मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या हत्येप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप (BJP) नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी केली आहे. सिरसा यांनी मूसेवाला यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणीही केली आहे.

सिरसा म्हणाले की, "आम्ही पंजाब सरकारला इशारा देतोय की, त्यांनी पंजाबमधील परिस्थितीकडे लक्ष द्यावं. भगवंत मान यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कर्तव्यातील निष्काळजीपणामुळेच सिद्धू मुसेवाला यांना आपला जीव गमवावा लागला, म्हणून मी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी करतो. अरविंद केजरीवाल यांच्यासह भगवंत मान यांच्यावर कलम 302 (भारतीय दंड संहितेच्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा."

मुसेवाला यांच्या हत्येबाबत पंजाबचे सीएम भगवंत मान यांनीही ट्विट करून हत्येमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही, असं म्हटलं आहे. तसंच माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, मी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करतो असं मुसेवाला मान म्हणाले.

दरम्यान, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनीही मूसेवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारे ट्विट केले आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असं त्यांनी लिहिलं आहे. त्यांनी पुढे लिहिलं की, मुसेवाला यांच्या हत्येमुळे राज्यातील भयावह कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिसून येतेय.

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित