ताज्या बातम्या

Mumbai Municipal Election : मुंबई महापालिकेत भाजपचा दबदबा; सर्वाधिक जागा जिंकून भाजपचा स्ट्राईक रेट अव्वल...

राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली सत्ता सिद्ध केली आहे.

Published by : Varsha Bhasmare

राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली सत्ता सिद्ध केली आहे. भाजपने केवळ सर्वाधिक जागा जिंकल्या नाहीत, तर स्ट्राईक रेटच्या बाबतीतही सर्व पक्षांना मागे टाकले आहे. मुंबईत भाजपने 135 जागा लढवल्या असून, त्यापैकी तब्बल 89 जागांवर विजय मिळवला आहे. म्हणजेच भाजपचा यशाचा स्ट्राईक रेट तब्बल 66 टक्के इतका राहिला आहे.

या निकालामुळे मुंबईच्या राजकारणात भाजपची ताकद अधिक ठळकपणे समोर आली आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्येच्या जवळ भाजप पोहोचला असून, महायुतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. भाजपची ही कामगिरी संघटनात्मक ताकद, प्रभावी प्रचार आणि उमेदवार निवडीचा परिणाम असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सर्वाधिक म्हणजे 160 जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले. उद्धवसेनेचा विजयाचा स्ट्राईक रेट 40.62 टक्के इतका राहिला. यामुळे भाजपच्या तुलनेत उद्धवसेनेची कामगिरी मर्यादित ठरल्याचे चित्र आहे. एकेकाळी मुंबईवर वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेची पकड यावेळी कमकुवत झाल्याचे या निकालातून स्पष्ट होते.

महायुतीतील दुसरा प्रमुख घटक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपसोबत युतीत 90 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 29 जागांवर विजय मिळवण्यात त्यांना यश आले. शिंदे गटाचा स्ट्राईक रेट 32.22 टक्के इतका राहिला आहे. ही कामगिरी मध्यम स्वरूपाची मानली जात असून, भविष्यात संघटना मजबूत करण्याचे आव्हान शिंदे गटासमोर आहे.

काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी युती करत 151 जागा लढवल्या. मात्र काँग्रेसला केवळ 24 जागांवर विजय मिळवता आला. त्यांचा विजयाचा दर 15.89 टक्के इतका राहिला. मुंबईसारख्या महानगरात काँग्रेसची घसरलेली कामगिरी पक्षासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने उद्धवसेना आणि मनसेसोबत आघाडी करत 11 जागा लढवल्या. मात्र त्यांना केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. त्यांचा स्ट्राईक रेट केवळ 0.90 टक्के इतका अत्यल्प राहिला आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धवसेनेसोबत युती करत 53 जागा लढवल्या, त्यापैकी केवळ सहाच जागांवर विजय मिळवला. मनसेचा स्ट्राईक रेट 11 टक्के इतका आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने 37 जागा स्वबळावर लढवत तीन ठिकाणी विजय मिळवला. त्यांचा विजयाचा दर 9 टक्के इतका राहिला आहे. एकूणच मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक प्रभावी कामगिरी करत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा