थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai BJP) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापौरपदाची निवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत भाजपाच्या महापौरपद निवडीच्या हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार असल्याची चर्चा रंगली असून राजश्री शिरवडकर, शितल गंभीर यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबईत भाजपच्या महापौरपद निवडीच्या हालचाली सुरू
48 तासात भाजपचा महापौरपदाचा चेहरा निश्चित होणार?
राजश्री शिरवडकर, शितल गंभीर यांची नावं आघाडीवर