Electoral Bonds Latest News 
ताज्या बातम्या

Electoral Bonds : भाजपला सर्वाधिक देणग्या, कोणत्या कंपन्यांकडून किती 'निवडणूक रोखे' खरेदी? वाचा सविस्तर माहिती

सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँड (निवडणूक रोखे) संदर्भात तपशील दिला.

Published by : Naresh Shende

सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँड (निवडणूक रोखे) संदर्भात तपशील दिला. त्यानंतर कोणत्या कंपन्यांकडून किती निवडणूक रोखे खरेदी करण्यात आले, याची माहिती समोर आली. २० कंपन्यांकडून ४५ टक्के निवडणूक रोखे खरेदी झालं असल्याचं समोर आलं आहे. वादग्रस्त कंपन्यांकडूनही कोट्यवधींचे रोखे खरेदी झाल्याची माहिती आहे. फ्यूचर गेमिंग, मेघा इंजिनिअरिंगकडून सर्वाधिक रोखे खरेदी करण्यात आले आहेत. तर २२ हजार कोटींपैकी बहुतांश देणग्या भाजपला मिळाल्या आहेत.

कोणत्या कंपन्यांकडून किती निवडणूक रोखे खरेदी?

१) फ्यूचर गेमिंग - १३६८ कोटी

२) मेघा इजिनिअरिंग - ९६६ कोटी

३) विचक सप्लाय चेन - ४१० कोटी

४) वेदांत लिमिटेड - ४०० कोटी

५) हल्दिया एनर्जी - ३७७ कोटी

६) भारती समुह - २४७ कोटी

७) एस्सेल मायनिंग - २२४ कोटी

८) वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन - २२० कोटी

९) केवेंटर फूडपार्क - १९४ कोटी

१०) मदनलाल लिमिटेड - १८५ कोटी

'निवडणूक रोखे'बाबत संजय राऊत काय म्हणाले?

अशा अनेक कंपन्या आहेत. ज्यांच्यावर ईडी कारवाई सुरु होती. ईडीच्या कारवाया थांबवण्यासाठी शकडो कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बाँड्स भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जमा झाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसने वेदांत ग्रुपवर गंभीर आरोप केला आहे, प्रकल्पाच्या मोबदल्यात निवडणूक रोखे दिल्याचं काँग्रसने म्हटलं आहे, ३९ कोटींच्या देणगीच्या मोबदल्यात १२ हजार कोटींचा प्रकल्प आहे का? असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा