मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. त्यांनी एक गौप्यस्फोट केला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काही राजकीय लोकांकडून आपल्याविरोधात कट रचला असून बदनामी करण्याचा डाव असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले. याप्रकणी प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे यांनी मी आज काही बोलणार नाही. पण लवकरच पुरावे देईन असे म्हटले होते. आता, बीडप्रमाणेच माझ्याविरोधात कट रचला जात होता. पण, मला आधीच माहिती मिळाल्याने मी पुरावे गोळा केले अन् वाचलो, असा गौप्यस्फोट गोरे यांनी केला आहे.
काय म्हणाले जयकुमार गोरे ?
माझ्या बाबतीतही बीड प्रमाणे धनंजय मुंडे सारखा कट घडवायचा होता. पण मला आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्याने मी यातून वाचू शकलो. अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कटात अडकविण्यासाठी प्रयत्न सुरू होते . यात अनेक जण सामील असून या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. सध्या पोलिस तपास करत असल्याने मी यावर काही विधान करणार नाही. पोलिसांची चौकशी झाल्यावर सर्व पुरावे आणि माहिती माध्यमांसमोर आणणार असल्याचा इशारा ही ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरे यांनी दिला आहे.