राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणावरून भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी खोचक टोला लगावला आहे. पवार कुटुंब एकत्र येणार अशा चर्चा होतात, पण प्रत्यक्षात ते एकत्र येत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत आहेत. 'अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे. जयंत पाटील, रोहित पवार हे बाजूला उभे असतात, त्यामुळे फक्त चर्चा होतात, निर्णय होत नाही,' असं चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे. तर मी महाविकास आघाडीमध्ये नसल्यामुळे यावर काही बोलू शकत नाही. अधिकृत शरद पवार आणि वरिष्ठ नेते यावर बोलू शकतील, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.