ताज्या बातम्या

Pune Special Report : काँग्रेस नेत्यांना भाजप गळाला लावणार?

विशेष चर्चा: काँग्रेस नेते भाजपच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले.

Published by : Team Lokshahi

गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये आयात नेत्यांचा मोठा भरणा झाला आहे. काँग्रेस असो, शिवसेना असो की आणखी कोणताही पक्ष त्यांच्या नेत्यांना भाजपने मुक्तहस्ते प्रवेश दिला आहे. आता मात्र भाजपने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला असल्याची चर्चा रंगली आहे. त्याला कारण ठरली आहे, भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांची व्हायरल झालेली आहे.

एकेकाळी भाजप स्वतःला ' पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेत असे आणि तत्त्वांवर चालणारी कार्यकर्त्यांची फळी असल्याचा दावा भाजप नेते करत असतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भाजपचा आयात उमेदवारांवरच भर दिसून आलेला आहे. आता उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांनाही भाजप दरवाजे खुले करीत आहे. काल भाजपच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नेमकं चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले जाणून घेऊया.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव केली असली तरी पोटातल, ओठात आल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते खरच भाजपच्या संपर्कात आहेत का आणि ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल. असे भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा