मनोज जरांगेच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर हे उपोषण सुरु आहे. अनेक मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी असून राजकीय नेत्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. काल 30 ऑगस्टला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली. दरम्यान काही आंदोलकांनी सुळे यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. तर, काही आंदोलकांनी पवार साहेबांनी आपलं वाटोळ केलं असे देखील सुप्रिया सुळेंना म्हटले होते. यापार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यां चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंचे कान टोचले आहेत.
चित्रा वाघ यांनी व्हिडिओ काढत आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्या म्हणाल्या की, "काय हो बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही तर मागे म्हणाल्या होतात, की मराठा आरक्षणाव्यतिरिक्त आणखीन महत्त्वाचे प्रश्न राज्यात आहेत. आठवत नसेल ना तर ही स्मरणगोळी तुम्हाला मी देते. पवार साहेब दोनदा नाहीतर, चारवेळा मुख्यमंत्री होते. आत्तापर्यंत 11 मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले, का नाही दिलं हो तेव्हा मराठ्यांना आरक्षण तुम्ही? काल आंदोलकांनी तुमच्या तोंडावर सांगितंल मराठ्यांचं वाटोळं पवार साहेबांनी केलं. मोठ्या ताई तु इधर-उधर की बात मत कर, मराठ्यांची मुख्य मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या. यावर तुमच्या गटाची काय भूमिका आहे ते एकदा राज्यासमोप स्पष्ट करा."