ताज्या बातम्या

अजित पवार यांना पाकिस्तानात पाठवा; भाजपाच्या 'या' नेत्याने केली मागणी

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. अजित पवार म्हणाले होते की, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी महाराज यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म बदलला नाही. औरंगजेबाने त्यांचे हाल केले, त्यांनी धर्मांतर करावे म्हणूनच हाल केले. पण संभाजी महाराजांना धर्माचा अभिमान होता. त्यांनी धर्मासाठी प्राणांची आहुती दिली. धर्माकरीता त्यांना वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणूनच त्यांना जगात धर्मवीर म्हणून मान्यता आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशी महाराजांची जगात ओळख आहे असे नरेंद्र पवार म्हणाले.

अजितदादांनी जे विधान केलं त्याबद्दल खरंतर त्यांना हिंदुस्थानातून हाकलून दिलं पाहिजे. पाकिस्तानमध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहीत नाही ते महाराष्ट्राचं दुर्देव आहे. ज्यांना संभाजी महाराज माहीत नाही, ज्यांना संभाजी महाराज धर्मवीर होते हे माहीत नाही, त्यांना या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,महाराष्ट्रातील एक नेते अजित पवार हे संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार नाहीत. त्यामुळे खरंच यांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे. मी निषेध करणार नाही. मागणी करेल. असे ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर

Latest Marathi News Update live : काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार