Prasad Lad Google
ताज्या बातम्या

प्रसाड लाड यांनी मनोज जरांगेंना सुनावलं; ट्वीटरवर म्हणाले, "मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव..."

भाजप नेते प्रसाद लाड यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Published by : Naresh Shende

Manoj Jarange Patil vs Prasad Lad: मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र द्वेषाचा रोग झाला आहे, असं विधान भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत लाड यांना बांडगुळ म्हणत पलटवार केला होता. आमच्या गोर-गरिब मराठ्यांमध्ये ढवळाढवळ करू नको. तुला महागात पडेल, असा इशाराही जरांगे यांनी लाड यांना दिला होता. अशातच आता प्रसाद लाड यांनी जरांगे यांचा समाचार घेतला आहे. लाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

प्रसाद लाड ट्वीटरवर काय म्हणाले?

मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, 'नरेटिव्ह'ची नाही! काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या.

हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी 2023-2024 चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. (6 जून 2024 च्या जाहिरातीनुसार)त्यांच्याकडे 2024-25 या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले.

आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी 60 वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा

Satara News : आश्चर्यचकित! साताऱ्यातील एका मातेने दिला ७ मुलांना जन्म, नेमकं प्रकरण काय?

Beed Heavy Rain : बीडमध्ये पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला

Income Tax Return Filing : ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस; अंतिम तारीख चुकल्यास...