ताज्या बातम्या

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही, तर...; राम कदमांचा टोला

आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरुच...

Published by : Team Lokshahi

मागील काही दिवसात राजकारणात खूप काही घडामोडी घडल्या, त्यातीलच एक म्हणजे 'शिंदेची बंडखोरी'. १९६६ पासून चालत आलेला ५६ वर्षांचा शिवसेनेचा वारसा ढासळला. शिंदेची बंडखोरी शिवसेनेच्या चांगलीच गळी उतरली. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासह शिवसेनच्या आमदार, खासदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु झाली. याच दरम्यान आता भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही, तर ते जनतेचं काय ऐकणार, असं वक्तव्य करत त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

राम कदम म्हणाले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांचाही त्यांनी मान राखला नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझा पक्ष काँग्रेससोबत जाणार नाही. जायची वेळ आलीच तर पक्ष बंद करून टाकेन. हे उद्धव ठाकरेंनी ऐकलं का? जी व्यक्ती स्वत:च्या संस्थापक अध्यक्षांचं ऐकत नाही, जी व्यक्ती स्वत:च्या वडिलांचं ऐकत नाही, ती व्यक्ती मुंबईच्या गोरगरिबांचं काय ऐकणार आहे, अशा शब्दात राम कदमांनी टोला लगावाला.

राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसचा सर्वेसर्वा कोण? तर राहुल गांधींचाच कुणीतरी. आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे कंपनीचा सर्वेसर्वा कोण? आदित्य ठाकरेंचं पोरगं. बाकीच्यांनी टीळा लावायचा, हाती झेंडा घ्यायचा आणि उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणायचं बाकी काही नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा