Bjp Leaders Complained To Amit Shah About Dcm Eknath Shinde In Delhi News 
ताज्या बातम्या

BMC Mayor : महाराष्ट्राचं राजकारण आता दिल्लीच्या दालनात, एकनाथ शिंदेंची थेट हायकमांडकडे तक्रार

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीने जोरदार बाजी मारली असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिकेतही सत्ता बदलली असून तब्बल २५ वर्षांनंतर ठाकरे गट बाहेर फेकला गेला आहे.

Published by : Riddhi Vanne

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीने जोरदार बाजी मारली असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिकेतही सत्ता बदलली असून तब्बल २५ वर्षांनंतर ठाकरे गट बाहेर फेकला गेला आहे. मात्र या विजयानंतरही राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे.

शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. नगरसेवकांवर अन्य पक्षांचा प्रभाव पडू नये, यासाठी हा बंदोबस्त केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून भाजपकडे अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तावाटपावरून तणाव वाढला आहे. ही बाब थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या काही नेत्यांमध्ये नाराजी असून, जास्त जागा लढवल्यामुळे मुंबईत भाजपचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विजयानंतरही महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा