भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांची पुन्हा एकदा जीभ घसरलेली पाहायला मिळलेली आहे. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटीलांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील काहीदिवसांपूर्वी गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्या वडीलांवरुन आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. त्यांच्या त्या विधानावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज दिला होता. आता पुन्हा गोपीचंद पडळकांची जयंत पाटलांवर ताशेरे ओढले आहेत.
या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक वेगळीच राजकीय वातावरण तयार होत आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या वादग्रस्त टीकेमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. सांगलीतील दसरा मेळावा आयोजित करण्यात होता. त्यांनी आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विरोधकांकडून नेहमी पडळकरांवर टीका करताना मंगळसूत्र चोर म्हणून टीका केली जाते. यावरुन संतापलेल्या गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटीलांना खोचक सवाल केला आहे.
गोपीचंद पाटील म्हणाले की, "तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, जयंतराव, तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं, हे सांग. बरोबर ना?" असे स्पष्ट शब्दात त्यांना प्रतिवाद केला. गोपीचंद पाटील यांना विरोधकांकडून "मंगळसूत्र चोर" अशी उपमा दिली जाते. यावरून संतापलेल्या पाटील यांनी अजून एक कडवट भाषण केलं. "तुम्ही मला गोप्या गोप्या म्हणून शिवी देत आहात. तुम्हाला हे मान्य आहे. मी एक सामान्य कुटुंबातून आलो आहे. मला गोप्या म्हणा, गाय म्हणा, फरक पडत नाही. पण मी तुला जयंत्या म्हटलं तर चालेल का?" अशी खोचक टीका त्यांनी केली.