Admin
ताज्या बातम्या

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज मंगळवारी निधन झालं.

Published by : Siddhi Naringrekar

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज मंगळवारी निधन झालं. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील आले होते. जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

१९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळवला.

१९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले.‌ १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : अशिष शेलार आणि जयंत पाटील यांची विधान परिसरात भेट

Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार

MNS In Pune : राज ठाकरेंविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं; 'तो फटके खाणारचं...', मनसे कार्यकर्ते आक्रमक

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला