मिठी नदी सफाई घोटाळ्यावरुन अभिनेता दिनो मोरिया चांगलाच अडचणीत सापडला आहे. काल त्याची यासंदर्भात कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच त्याने आज अटकपूर्व जामीनासाठी अर्जदेखील दाखल केला आहे. अशातच आता नितेश राणे यांनी या सर्व प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
नितेश राणे म्हणाले की, "डिनो मोरिया हे आदीत्यचे बॉयफ्रेंड आहेत. सॉरी मित्र आहेत. पालिकेत सत्ता असताना त्यांनी धिंगाणा घातला. आदीत्य मंत्री असताना डिनो मोरिया वारंवार घरी जायचे. मुंबईच्या सर्व गोष्टीला जबाबदार आदीत्यची नाईट लाईफचे मित्र आहेत. डिनो मोरिया ही मातोश्रीची सून आहे. त्यांचे मातोश्रीशी थेट संबध आहेत".
पुढे ते म्हणाले की, "आदीत्यने माझासोबत खुल्या व्यासपीठावर येऊन चर्चा करावी. इथे तिथे थोबाड उघडू नये. डिनो मोरियासोबत अय्याशी केली नसती तर मुंबई बुडाली नसती. यांनीच नाईट लाईफ गॅंगला कंत्राटं दिली त्यामुळे ही अवस्था झाली आहे".