ताज्या बातम्या

जिथं शो करशील तिथं आग लावू; मुनव्वर फारुकीला BJP आमदार राजा सिंह यांची धमकी

Published by : Sudhir Kakde

तेलंगणातील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आमदारानं गुरुवारी स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याच्यावर हल्ला करण्याची धमकी दिली. राज्य सरकारने मुनाव्वरला हैद्राबादमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली तर ते त्याच्या कार्यक्रमाचं स्टेज जाळून टाकतील अशी धमकी भाजप आमदाराने दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हैद्राबादच्या गोशामहल मतदारसंघातील भाजप आमदार टी राजा सिंह म्हणाले, मुनव्वर फारुकीने हिंदू देवतांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे त्याला हैद्राबादमध्ये शो करण्यास परवानगी देऊ नये.

भाजप आमदारानं इशारा दिलाय की, "जर त्यांना हैदराबादमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं तर काय होईल ते दाखवून देऊ. जिथे कार्यक्रम असेल, तिथे त्याला पिटाळू. जिथे कुठे त्याचा कार्यक्रम असेल, ती जागा आम्ही जाळून टाकू. तेलंगणात आला तर आम्ही त्याला आमच्या प्रभू रामाला शिव्या दिल्याबद्दल नक्कीच धडा शिकवू. हे खूलं आव्हान आहे." असं टी राजासिंह म्हणाले आहेत. राजा सिंह म्हणाले, आम्हाला माहिती मिळाली आहे की, कॉमेडियन मुनव्वर फारुकी अद्याप हैद्राबादमध्ये परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे, पण तुम्ही तो कार्यक्रम जिथे आयोजित करायचा आहे तिथे करा. मग ते कोणतंही थिएटरमध्ये असो, कोणतंही ठिकाण असो. तुम्ही कुठेही हा कार्यक्रम आयोजन कराल, आम्ही तो उधळून लावू आणि मुनव्वर फारुकीला धडा शिकवू.

दरम्यान, फारुकी यांनी बुधवारी इंस्टाग्रामवर आपल्या शोबद्दल माहिती दिली होती. 20 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये 'डोंगरी टू नोव्हेअर' नावाचा शो आहे. या शोसाठी 499 रुपये तिकीट ठेवण्यात आलं आहे. ही तिकिटं ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर विकली जाणार आहेत.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...